Take a fresh look at your lifestyle.

नववर्षाच्या सुरवातीला भूमीचा ‘बोल्ड आणि बिनधास्त’ अंदाज

नेहमीच साध्या वेशभूषा परिधान करणारी भूमी पेडणेकरचा हॉट लूक नुकताच समोर आला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने वर्षाच्या पहिल्या दिवशी समुद्रकिनारी आंघोळ करत आपला फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर प्रसिद्ध केला. भूमी सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ अनुभवत आहे. २०१९ सालात तिने एकाहून एक दमदार चित्रपट आणि त्याला प्रेक्षकांचाही दमदार प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं. मागील वर्षी प्रत्येक चित्रपटात तिचा दमदार अभिनय दिसून आला. २०१९ मध्ये तिला तब्बल ४ चित्रपट मिळाले आणि त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला.

समुद्रास्नानाच्या व्हिडिओची माहिती देताना भूमीने लिहिलं आहे, “माझ्याकडे गेल्या दशकात जगण्यासाठी खूप सुंदर क्षण मिळाले. या वास्तविक जीवनात मला मागील दशकात खूप काही शिकायला मिळालं आहे. या धडपडीने मलाही बळ दिले आहे. तथापि या दशकात मी बरेच लोक गमावले आहेत, ज्यांची जागा कधीही भरू शकत नाही. या दशकात मला माझी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देखील मिळाली. माझ्या या प्रवासात माझ्या कुटुंबाने नेहमी मला साथ दिली असून त्यांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहचू शकले.”

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातुन भूमीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या अभिनयाचे सर्वानी कौतुकही केले. “मला आशा आहे की पुढील दशक आणखी चांगले होईल. पुढील वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा ” असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.