Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस १३ मधल्या सिद्धार्थच्या अटकेचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल !

इडियट बॉक्स । बिग बॉसचे १३वे पर्व अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शो मधील स्पर्धकांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत. या स्पर्धकांमधील सिद्धार्थ शुक्लाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरातील इतर स्पर्धकांशी सतत होणाऱ्या भांडणांमुळे तो चर्चेत आहे. अशातच सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

   या व्हिडीओमध्ये पोलीस सिद्धार्थला पकडून व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ जुना आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थचा हा व्हिडीओ २२ जुलै २०१८मधील आहे. त्यावेळी सिद्धार्थवर वेगात कार चालवण्याचा आरोप करण्यात आला होता. सिद्धार्थने इतक्या वेगाने कार चालवली होती की त्याचा कारवरील ताबा सुटला होता आणि तो ३ गाड्यांना धडक देतो. या घटनेमध्ये सिद्धार्थला कोणतीही दुखापत झाली नव्हती. पण इतर तिघांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल बॉलिवूडने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.