Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने हिरावला निक्की तंबोलीचा भाऊ; भाऊक होऊन पोस्ट केली शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सिझन १४ फेम निक्की तंबोली चा सख्खा भाऊ जतिन तंबोलीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. याविषयी निक्किने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे.. तिने अत्यंत भाऊक मनाने ही पोस्ट शेअर केली आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी कोरोनाशी झुंज देणाऱ्या भावाच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून तिने एक पूजा देखील केली होती. ज्याचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते.

निक्कीचा भाऊ जतिन अवघ्या २९ व्या वर्षी आपल्या कुटुंबीयांना सोडून गेला असल्याने तांबोली कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जतिनवर गेल्या २० दिवसांहून अधिक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना यश न आल्याने जतिनने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान जतिन बऱ्याच आजारांशी लढत देत होता, अशी माहिती आहे.

निक्किसाठी तिचा भाऊ अत्यंत लाडका होता. अगदी मनाच्या जवळची व्यक्ती हिरवल्याने निक्कीला हा धक्का पचविणे कठीण जात आहे. जतीन रुग्णालयात असताना निक्कीने अनेकदा त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी तिच्या चाहत्यांनी प्रार्थना करावी अशी विनंती केली होती. मात्र या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर कोरोनाने निक्किचा भाऊ तिच्यापासून हिरावलाच. 

याआधी निक्कीला सुद्धा कोविडची लागण झाली होती. मात्र तिने संबंधित सर्व सुचनांचे योग्य वेळी पालन करीत कोरोनावर मात केली. सध्या संपूर्ण जगभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढताना दिसत आहे. मात्र लोकांनी अजूनही गांभीर्याने ही बाब घेतलेली नाही. शासनाच्या नियमांचे होणारे उल्लंघन आता जीवावर बेतताना दिसत आहे. मृत्यूचे तांडव डोळ्यासमोर होत असतानाही लोकांना मात्र जाग येत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.