Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व लवकरच; उत्सुकता शिगेला !

इडियट बॉक्स । मराठी टीव्ही विश्वातला सर्वात पॉप्युलर रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. त्यानंतर हे पर्व संपत नाही तर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजलं. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

   एका व्हायरल व्हिडीओमध्ये बिग बॉसचा मंच दिसत असून हे नवीन पर्व लवकरच सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच यंदाच्या पर्वात अंतराळाची थीम ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

   सध्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकं काय होणार असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. मात्र अद्यापतरी तिसऱ्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकं हे पर्व कधी सुरु होईल हे मात्र गुलदस्त्यातच आहे.