Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बॉस१३’मधील या अभिनेत्रीवर झालेला जबरदस्तीचा प्रयत्न

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सध्या छोट्या पडद्यावर रिऍलिटी शो चे पेव फुटले आहे.अशाच एक प्रचंड गाजावाजा झालेला शो आहे बिग बॉस. या बिग बॉस चा यंदाचा पर्व १३ नुकतेच संपले आहे. या ‘बिग बॉस १३’ रिऍलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आरती सिंह हिने नुकतेच एक धक्कादायक विधानाचा खुलासा केला आहे. तिच्या या धक्कादायक अशा विधानामुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने सांगितले कि “मी १३ वर्षाची असताना एका अज्ञात इसमाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता”. असे खळबळजनक विधान ‘बिग बॉस १३’मध्ये असताना आरतीने केले होते. यावर आता तिच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

“बिग बॉस १३ मध्ये असताना आरतीने सांगितलेला तो किस्सा ऐकून मला धक्काच बसला.याविषयी तिने त्यावेळीच का सांगितले नाही याचे मला खूप दु:ख झाले. हे ऐकून आमच्या कुटुंबातील सर्वच जण खूप दु:खी झाले.तीन दिवस तर मी काहीच खाल्ले नव्हते.” अशा शब्दात आरतीच्या आईने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.


View this post on Instagram

 

A post shared by Arti Singh (@artisingh5) on Feb 19, 2020 at 1:38am PST

 

आरती सिंह बिग बॉस१३ मधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. खुद्द सलमान खानने तिची अनेकदा स्तुती केलेली होती. मात्र अंतिम पाच जणांमधून ती बाहेर पडली.

 

Comments are closed.

%d bloggers like this: