Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस सेलिब्रिटी शहनाज गिलच्या वडिलांचा बलात्काराच्या आरोपाबाबत मोठा दावा, म्हणाले…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत. आता या आरोपांवर संतोख सिंग यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या विषयावर बोलताना संतोखसिंग यांनी स्थानिक वाहिनीशी बोलताना सांगितले आहे की,’ जेव्हा या महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला तेव्हा तो दिवसभर घरीच होता. यासह संतोख सिंह म्हणाले की,’त्यांचे संपूर्ण घर हे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे, जे याचा पुरावा देखील आहे. यासह संतोखसिंग यांनी सांगितले की,’ ज्या ठिकाणी हि घटना घडली तिथले सीसीटीव्ही फुटेजही मिळालेले आहेत.’

संतोखसिंग पुढे म्हणाले, “जेव्हा महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला तेव्हा मी दिवसभर माझ्या घरीच होतो. माझे संपूर्ण घर हे सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे, याचा पुरेसा पुरावाही माझ्याकडे आहे. या महिलेचा घटस्फोट झाला आहे आणि तिला एक मूलही आहे. तिला माझा बिझिनेस पार्टनर लकी संधू बरोबर लग्न करायचं आहे. मी लकीला बर्‍याच काळापासून ओळखत आहे आणि मी त्याला त्याचा हा विषय वैयक्तिकरित्या मिटवण्याचा सल्लाही दिला आहे. “


View this post on Instagram

 

@shehnaazgill @sukhpardhanbeas Please Galat comment mat karo FIR ho sakti hai

A post shared by SANTOKH SINGH SUKH (@santokhsukh1) on Apr 20, 2020 at 11:59am PDT

 

हे संपूर्ण प्रकरण असे आहेः
आपल्या तक्रारीत, या ४० वर्षीय महिलेने म्हंटले आहे की,’ ती आणि जालंधर येथील लक्की संधू उर्फ ​​रणधीरसिंग संधू गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि चांगले मित्रही आहेत. अलीकडेच या दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले. दरम्यान, महिलेला समजले की, लकी सध्या अजित नगर येथे राहणाऱ्या संतोख सिंग याच्या घरी येणार आहे. त्यानंतर ही पीडित महिला संतोख सिंगला भेटायला त्याच्या घरी गेली.

ती आपल्या कारमधून एका मित्राबरोबर लकीला भेटण्यासाठी संतोखच्या घरी गेली. तक्रारीनुसार आरोपी संतोख त्यावेळी त्याच्या घराच्या बाहेरच थांबला होता. त्यानंतर त्याने पीडितेला तिच्या गाडीतून उतरून त्याच्या कारमध्ये बसण्यास सांगितले आणि म्हणाला की ‘तो आता लकीला भेटायला जाणार आहे’.

याचदरम्यान संतोख याने गाडी थांबवून बंदुकीने जिवे मारण्याची धमकी दिली आणि कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने तिला सीमेजवळील भागात सोडले. मंगळवारी महिलेने या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.