Take a fresh look at your lifestyle.

‘ईद’ला रंगणार बॉक्स ऑफिसवरचं सर्वात मोठं युद्ध !

कोण जिंकेल बॉक्स ऑफिसची सत्ता?

बॉलीवूड अड्डा । आजवरची सर्वात मोठी बॉक्स ऑफिस लढत कोणती असेल ? तान्हाजी – छापाक, लगान – गदर, नाही तर यावर्षी येणाऱ्या ईद ला होणार आहे ती. सुपरस्टार सलमान खानचा राधे या ईद ला येणार होता, त्याच वेळी दुसरा सुपरस्टार अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब ची तारीख हि नेमकी तीच ठरले. दोन मोठे सुपरस्टार सहसा एकमेकासमोर येण्याचं टाळतात. पण यावेळी ते घडणार आहे. पण कहर तर तेव्हा झाला कि आज, जगप्रसिद्ध फास्ट अँड फ्युरियसची फ्रँचाइजी चा नव्वा भाग यावर्षी ईदलाच रिलीज होणार आहे. आहे ना बघण्यासारखी लढत ?

   अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब सुद्धा खूप चर्चेत आहे, त्याने पहिल्यांदाच एका तृतीयपंथ्यांची भूमिका करणार आहे. त्याच्या लुक ची सर्वत्र चर्चा होती. त्यात साउथचा रिमेक, भारतामध्ये अशा चित्रपटांचे किती फॅन्स आहेत, हे सांगायची गरज नाही.

   सलमान भाईंचं काही बोलायलाच नको, नावच बाकी आहे गर्दी खेचायला. त्यात तो बऱ्याच वर्षांनी पुन्हा राधे बनलाय.

   जगप्रसिद्ध फास्ट अँड फ्युरियसची फ्रँचाइजी तुम्हाला माहितीच असेल. एका पेक्षा एक थरारक ऍक्शनसाठी हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. वीन डिझेल हा ऍक्टर यात प्रमुख भूमिकेत दिसत असला तरी, ड्वेन जॉन्सन म्हणजेच रॉकची एन्ट्री झाल्यापासून चित्रपटाने प्रसिद्धीच्या साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत. चार चाकी गाड्यांपासून विमानापर्यंतची सर्व तुफान ऍक्शन यात भरलेली असते.

   तर मग बघू आता ईदला काय राडा होतो ते !

 

Comments are closed.

%d bloggers like this: