Take a fresh look at your lifestyle.

आता येणार सौरव गांगुलीवर बायोपिक? ‘या’ अभिनेत्याला पसंती..

0

चंदेरी दुनिया | अभिनेता हृतिक रोशनचे जगभरात लाखो चाहते आहेत. रोमँटिक, विनोदी, अॅक्शन अशा कोणतीही भूमिका तो तडफदारपणे साकारतो. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही हृतिकचा मोठा चाहता आहे.

एका टॉक शोदरम्यान सौरवनं हृतिकच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं. ‘पुढे जाऊन माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती झाली तर त्यात माझी भूमिका हृतिकनंच साकारावी’, अशी इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.

सौरव गांगुलीच्या आयुष्यात सुद्धा मोठ्याप्रमाणावर चढ उतार आहेत. तसेच सौरव गांगुलीचा मोठा चाहतावर्ग जगभरात आहे. सध्या गांगुली बीसीसीआयचा अधक्ष्य आहे. या अगोदर तो दिल्ली कॅपिटल्स चा मार्गदर्शक व बंगाल क्रिकेट असोसिएशन चा अध्यक्ष सुद्धा राहिला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: