Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेत्याने फराह खानवर साधला निशाणा म्हणाला,

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आजकाल चित्रपटांपासून दूर आहे पण लवकरच तो चित्रपट साइन करेल अशी चर्चा आहे. आता बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता कमल आर खानने शाहरुख खानबद्दल नुकतेच एक ट्विट केले आहे, जे चर्चेत आहे आपल्या ट्विटमध्ये त्याने शाहरुख खानचे करिअर खराब करण्यासाठी फराह खानला जबाबदार धरले आहे. कमल आर खान यांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. या ट्विटवर वापरकर्ते तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

 

कमल आर खान यांनी लिहिले: “शाहरुख खानचे करिअर खराब करण्यासाठी दिग्दर्शक फराह खान जबाबदार आहेत.तिने तिच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या सर्वात वाईट चित्रपटाने त्याचे करियर खराब केले. आणि त्यात भर म्हणून शाहरुख खान अजून दिलवाले, फॅन, रईस, झिरो यासारखे वाईट चित्रपट करत आहे. ” कमल आर खानने शाहरुख खानसाठी केलेल्या ट्विटमध्ये फराह खानला लक्ष्य केले.

कमल आर खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. ‘देशद्रोही’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारे कमल आर खान उर्फ ​​केआरकेने टीव्ही रिऍलिटी शो ‘बिग बॉस ३’ मध्येही बरीच धमाल केली होती. याशिवाय कमल आर खान सोशल मीडियावर सध्याच्या घडामोडींबाबत अनेकदा आपले मत बिनधास्त पणे मांडतात. यासह, तो बॉलिवूड चित्रपटांशी संबंधित सर्वेक्षण आणि समीक्षा देखील करतो. विशेष म्हणजे कमल आर खान यांचे ट्विटही खूप व्हायरल झाले आहे.