Take a fresh look at your lifestyle.

‘जनता कर्फ्यू’ च्या कठोर परिश्रमांवर या लोकांनी फिरवले पाणी,बॉलिवूड अभिनेत्याने दिली संतप्त प्रतिक्रिया

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोनाव्हायरससंदर्भात आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’ लगावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूद्वारे आवाहन केले होते की,या लढाईत लढत असलेल्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी घरांच्या बाल्कनी किंवा छप्परांवर येऊन टाळी आणि थाळी वाजवा. जनता कर्फ्यूचा एक व्हिडिओ बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयने शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ निराश करणारा आहे. या व्हिडिओमध्ये लोक संध्याकाळी घराबाहेर पडताना टाळ्या वाजवत, थाळी वाजवत आणि कीर्तन करताना दिसत आहेत.

 

बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयने आज देशभर जनता कर्फ्यू दरम्यान एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले ‘खरंच?’ यावर बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्तानेही कमेंट केली आहे. दिव्य दत्ताने लिहिले आहे की, ‘गंभीरपणे? त्यांना ते समजले नाही !!! देवा, त्यांना घरी कसे ठेवता येईल.

बॉलिवूड निर्माता अतुल कसबेकर यांनी यावर कमेंट केली आणि रागावले की काही लोक घंटा आणि शिट्ट्यांमधून विषाणूच्या मरणाबद्दल बोलत आहेत, ते किती मूर्ख आहेत. अशा प्रकारे त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. राग देखील यायला हवा जेव्हा सोशल डिस्टेंसिंग करण्याची गरज असते तेव्हा ही माणसे अशी कामे करीत आहेत.