Take a fresh look at your lifestyle.

गर्दीने भरलेली ट्रेन पाहून बॉलिवूड अभिनेत्याचे सरकारकडे अपील म्हणाला,”खूप उशीर होण्यापूर्वी…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे आणि सर्व मार्गदर्शक सूचना जारी करीत आहे. सेलिब्रेटी देखील या मोहिमेसाठी आपला हातभार लावत आहेत आणि व्हिडिओ पोस्ट करुन लोकांना जागरूक करत आहेत. पण यादरम्यान सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विशेष आवाहन केले आहे.

 

सुशांत सिंगच्या या व्हिडिओमध्ये प्रवाशांमुळे गाड्यांना गर्दी झाल्याचे दिसून येते आहे. लोक दारात लटकून प्रवास करत आहेत. इतकेच नाही तर प्लेटफॉर्मवरही प्रवाशांची मोठी गर्दी आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले: “भारत सरकार, हा धडकी भरवणारा क्षण आहे. आता आम्हाला संपूर्ण लॉक-डाऊन गरजेचा आहे.सरकार त्यांची काळजी घेईल याची लोकांना खात्री देण्याची गरज आहे. आम्हीही करू. मी हात जोडून प्रार्थना करतो. खूप उशीर होण्यापूर्वी हे करायला हवे. ” सुशांत सिंग यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहे..

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे असे सरकार म्हणत असताना सुशांत सिंग यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अशा परिस्थितीत असा व्हिडिओ पाहणे फारच धक्कादायक आहे.सुशांत सिंह सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि तो बर्‍याचदा ट्विटरच्या माध्यमातून सध्याच्या घडामोडींवर मते मांडतो. सुशांत सिंग यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतही आपले मत मांडले होते.त्याने अनेक वेळा ट्रोलर्सचा सामनाही केला. यापूर्वी सुशांत सिंग ‘सावधान इंडिया’ शो होस्ट करायचा.

 

Comments are closed.