Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण; पालिकेकडून घर सील

0

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका असल्याचे सांगितल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यात आता बॉलिवूड क्षेत्रात खळबळ करणारी एक बातमी समोर येतेय. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिला कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी मुंबई महानगरपालिकेकडून तिचे घर सील करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पालिकेकडून मिळाली असून लाराच्या घराचा परिसर सील करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेला माहिती मिळतात अभिनेत्री लारा दत्ता हिचे मुंबईतील बांद्रा स्थित घर सील करण्यात आले आहे. याशिवाय तिच्या घराचा परिसर हा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात कुणालाही शिरकाव करण्याची परवानगी नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री लारा दत्ता व्यतिरिक्त तीच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. शिवाय लारा दत्ताची प्रकृती देखील व्यवस्थित आहे. तसेच अभिनेत्री तिच्या घरात होम क्वारंटाईन असून योग्य ते उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उपचारांना सुरुवात झाली आहे.

लारा दत्ता ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शिवाय ती एक यशस्वी उद्योजक आणि मिस युनिव्हर्स २००० या स्पर्धेची ती विजेती आहे. तिला मिस इंटरकॉन्टिनेंटल १९९७ हा किताबदेखील मिळाला होता. अभिनेत्री लारा दत्ता हिने तिच्या कारकिर्दीत प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. लाराला आतापर्यंत विविध पुरस्कारांसह आणि फिल्मफेअर पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले आहे. लाराच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर ती ‘बेल बॉटम’ या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेश यांच्यासोबत झळकली होती. लाराने डिजिटल प्लॅटफॉर्मवरीलही काही प्रोजेक्ट्स केले आहेत. यातील १०० डेज हि वेब मालिका चांगलीच गाजली होती. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू झळकली होती.