Take a fresh look at your lifestyle.

बॉयफ्रेंडसाठी ‘या’ अभिनेत्रीने सोडले आईवडिलांचे घर….

0

चंदेरी दुनिया । चंदेरी दुनियेतील लव्ह अफेयर्स ब्रेकअप यांचे किस्से सतत ऐकण्यात येत असतात. असाच एका अभिनेत्रीच्या ब्रेकअपच्या किस्स्यावर सध्या बीटाऊनमध्ये चर्चा सुरू आहे. अभिनेत्री रश्मी देसाई सध्या बिग बॉसच्या घरात तिच्या एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लासोबतच्या भांडणांमुळे चर्चेत आली आहे. रश्मीचे काही वर्षांपूर्वी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत अफेयर होते. त्याच्या प्रेमात रश्मी इतकी दिवानी झाली होती की तिने त्याच्यासाठी आई वडिलांचे घरही सोडले होते. मात्र नंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाल्यावर रश्मीला राहण्यासाठी घरही नव्हते, असे समजते. काही दिवसांपूर्वी रश्मीने स्वत: ती रस्त्यावर आली होती, तिच्याकडे राहायला घर नव्हते हे बिग ब़ॉसच्या घरात मान्य केले होते.

रश्मी व तिचा सहकलाकार नंदिश संधू यांचे लग्न झाले होते. मात्र नंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. नंदिशसोबतच्या घटस्फोटानंतर रश्मीचे 2016 मध्ये लक्ष्य लालवानी नावाच्या अभिनेत्यासोबत अफेयर होते. लक्ष्य मुख्य भूमिकेत असलेल्या एका मालिकेत रश्मीची स्पेशल एन्ट्री होती. त्याचवेळी त्यांची ओळख झाली व ते एकमेकांच्या प्रेमात पडले. लक्ष्य हा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. रश्मीच्या आईला मात्र तिचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी रश्मीला एकतर लक्ष्य किंवा त्यांच्यापैकी एकाला निवडायला सांगितले. त्यावेळी रश्मीने लक्ष्यची निवड केली होती.

त्यानंतर रश्मी व लक्ष्य त्याच्या घरी एकत्र राहू लागले. मात्र कालांतराने लक्ष्य व रश्मीमध्ये वाद होऊ लागले. एका पार्टीत तर लक्ष्य व रश्मीचे भांडण एवढे वाढले की त्याने सर्वांसमोर दारूची बाटली जमिनीवर फोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच एकमेकांचे तोंड पाहिले नाही. लक्ष्यसोबत भांडण झाल्याने रश्मीला त्याचे घर सोडावे लागले. त्यानंतर तिने काही दिवस मित्र मैत्रिणींकडे काढल्यानंतर लोखंडवाला येथे तिचा मित्र अरहानने तिला सहारा दिला. सध्या अरहान खान व रश्मी एकमेकांना डेट करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.