Take a fresh look at your lifestyle.

आईला भेटण्यासाठी ‘हि’बॉलिवूड अभिनेत्री १४०० किमी ड्राइव्ह करत पोहोचली मुंबईहून दिल्लीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे.

स्वराने मुंबईहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला
अभिनेत्री स्वरा भास्करची आई जखमी झाली आहे. तिच्या आईच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे स्वराला तिच्या आईबद्दल फारच काळजी वाटू लागली होती आणि तिला आपल्या आईला दिल्लीमध्ये असे एकटं सोडता आलं नाही. म्हणून या अभिनेत्रीने अगदी घाईघाईनेच मुंबईहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाण्यापूर्वी तिने प्रशासनाकडून प्रत्येक प्रकारची परवानगी घेतली होती. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच तिने मुंबई ते दिल्लीचा प्रवास केला. आता ही अभिनेत्री आपल्या आईसमवेत दिल्लीत आहे. स्वराने तिचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.


View this post on Instagram

 

Face sans make up. Hair sans extensions. Life sans regrets. Me as me. #me #selfpotrait

A post shared by Swara Bhasker (@reallyswara) on May 19, 2020 at 1:57pm PDT

ती प्रत्येक विषयावर अविचारीपणे बोलते स्वरा भास्कर ही अशा काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे जी आपले विचार मुक्तपणे व्यक्त करत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच तिने टिक टॉक वर देखील चांगळीच शाळा घेतली होती. महिलांविरूद्ध काही आक्षेपार्ह व्हिडिओ टिक टॉकवर दाखविल्याबद्दल स्वराने आपला संताप व्यक्त केला होता.