Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड मध्ये येण्याआधी हॉटेलात काम करायची ‘ही’ अभिनेत्री…

0

चंदेरीदुनिया । श्रुतीने अशोक अ‍ॅकेडमीमधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजातून इकॉनॉमिक्स आणि कॉमर्समध्ये पदवी घेतली. आपल्या करिअरची सुरूवात तिने मुंबईच्या ताज हॉटेलामधून केली. होय, या हॉटेलात श्रुती गेस्ट रिलेशन एक्झिक्युटीव्ह होती. खरे तर मॉडेलिंगमध्ये येण्याचा तिचा कुठलाही इरादा नव्हता. पण नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. सुंदर चेहरा आणि अंगभूत प्रतिभा पाहून काही लोकांनी तिला मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. मग काय श्रुतीने केवळ पॉकेटमनीसाठी मॉडेलिंग सुरु केली. पण काहीच दिवसांत ती मोठमोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करू लागली.

क्लीन अ‍ॅण्ड क्लीअर , टाटा होम फायनान्स, पॉन्ड्स, फ्रूटी, लाईफब्वॉय, एलजी, एअरटेल अशा अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केली. मॉडेलिंगनंतर मात्र श्रुतीला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले.

अशात एका चॅनलवर तिला व्हिजे म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2001 मध्ये श्रुतीने ‘श्श्श… कोई है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर डेब्यू केला. नंतर मान, देश में निकला होगा चांद, क्यों होता है प्यार, कुछ कर दिखाना है, धक धक इन दुबई, रिश्ता डॉट कॉम, बाल वीर अशा अनेक मालिकेत ती झळकली.

‘शरारत’ या मालिकेतील श्रुतीची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. आमिर खान आणि काजोल यांच्या ‘फना’ या सिनेमात तिची वर्णी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.