Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगनने शेअर केला ‘रेड’ चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ,चाहत्यांनी ‘रेड २’ ची केली मागणी

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘रेड’ चित्रपटाला रिलीज होऊन दोन वर्षे झाली आहेत. चित्रपटाच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेत्याने आपल्या चाहत्यांसाठी फिल्म मेकिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. देवगन यांनी ट्वीट केले की, “रेड हा चित्रपट रिअल टाइममध्ये तयार केलेला होता, त्यामुळे प्रेक्षकांना तो खूप आवडला. हॅशटॅग २ ईयर ऑफ रेड।””

त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने म्हटले आहे की, “लव्ह यू सर. मी रेड २साठी उत्सुक आहे. तुम्ही हे केव्हा करणार आहात?”

 

 

दुसरा म्हणाला, “रेड २ सर.”

 

इतर चाहत्यांनीही अशाच मागण्या केल्या आहेत. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगण, इलियाना डिक्रूझ, सौरभ शुक्ला, अमित सियाल, शीबा चड्डा आणि इतरांनी केले आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट १६ मार्च २०१८ रोजी रिलीज झाला ज्याने चांगला व्यवसाय केला.

 

Comments are closed.