Take a fresh look at your lifestyle.

अजय देवगन, करण जोहर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रोहित शेट्टीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अ‍ॅक्शन किंग रोहित शेट्टीचे चित्रपट सर्वांचे मन जिंकतात. रोहितचे चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण रोहित शेट्टीचे सलग ८ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. रोहित शेट्टी लवकरच कॉप ड्रामा घेऊन येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. रोहित शेट्टी यांना अजय देवगन, करण जोहरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने रोहित शेट्टीसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले- हाय रोहित, हॅपी बर्थडे आणि येणारे वर्ष खूप चांगले जावो.


View this post on Instagram

 

Hi Rohit, here’s wishing you a fabulous birthday and a fantastic year ahead.

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on Mar 13, 2020 at 10:12pm PDT

 

कतरिना कैफने इंस्टाग्राम स्टोरीवर रोहित शेट्टीचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले-‘वाढदिवसाच्या शुभेच्छा.भरपूर प्रेम.

katrina kaif instagram story

करण जोहरने रोहितसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघेही दरवाजा उघडताना दिसत आहेत. करणने लिहिले -‘ एकाच वेळी सिनेसृष्टीच्या संधीसाठी अनेक दारे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहित शेट्टी. बरेच प्रेम आणि ह्ग.

कुणाल खेमूने रोहित शेट्टी बरोबरचा फोटो शेअर करताना लिहिले- माझ्या भाऊ असाच चमकू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहित शेट्टी.