Take a fresh look at your lifestyle.

अजयने वडील वीरू देवगण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अजय देवगणच्या वडिलांनी २७ मे २०१९ रोजी जगाचा निरोप घेतला. अजयने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. वीरू देवगन बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंट कोरियोग्राफर होते. वडिलांसोबतच्या काही आठवणी सांगत अजय देवगणने लिहिले,’ डियर डॅड तुमच्या जाण्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मी तुम्हांला नेहमीच आमच्याबरोबर बघू शकतो. शांततेत, काळजी घेणारे , संरक्षक; तुमची उपस्थिती आनंददायी आहे.’

 

अजय देवगन आपल्या वडिलांच्या अगदी जवळ होता आणि तो त्यांना आपला गुरुही मानत होता. आपल्या बॉलिवूड कारकिर्दीचे सगळे श्रेय तो वडिलांनाही देतो, कारण वीरू देवगण यांना वाटायचे की, अजयने सुपरस्टार बनावे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांनी अजयला चित्रपटांसाठी तयार करण्यास सुरवात केली.

 


View this post on Instagram

 

My Father, My Guru. He gave me invaluable life lessons 🙏 #HappyTeachersDay

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on Sep 5, 2019 at 2:01am PDT

 

वीरू देवगणने आतापर्यन्त ८० हून अधिक चित्रपटांमध्ये स्टंट कोरियोग्राफ/ डायरेक्ट केलेले आहेत. दिलवाले, शहेनशाह, हिंदुस्तान की कसम अशा अनेक चित्रपटात त्याने स्टंट कोरियोग्राफ केले आहे. १९९२ साली आलेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अ‍ॅ क्शन डायरेक्टर या पुरस्काराने गौरविण्यात आले.