Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे ३१ मार्चपर्यंत दिल्लीत सिनेमा हॉल बंद केजरीवाल सरकारचा निर्णय

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना विषाणूची साथीचा रोग जाहीर करत ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे बंद राहतील हा आदेश दिला. सिनेमाप्रेमींसाठी ही नक्कीच वाईट बातमी आहे, परंतु कोरोनाविरूद्ध संरक्षण देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वीच जम्मू-काश्मीर आणि केरळमध्येही कोरोनाच्या भीतीने सर्व सिनेमा हॉल बंद झाले आहेत.इरफान खानचा कमबॅक चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ शुक्रवारी रिलीज होणार आहे, अशा स्थितीत या चित्रपटाचे नुकसान होऊ शकते. गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी ३ या चित्रपटाच्या कमाईवरही त्याचा परिणाम होईल.

 

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची रिलीज डेट कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट २८ मार्चला नव्हे तर १० एप्रिलला रिलीज होण्याची शक्यता आहे.