Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेकसोबत शेअर केला फोटो,कॅप्शनमध्ये लिहिले- ‘बडे मिया तो बडे मिया …’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि बर्‍याचदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. नुकताच त्यांनी मुलगा अभिषेक बच्चनसोबतचा फोटो शेअर करत एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोत त्याचा मुलगा अभिषेक देखील दिसत आहे. या दोघांनी पांढरा कुर्ता-पायजामा आणि लाल जॅकेट परिधान केले आहे. बिग बीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह !!’

बिग बीने पुढे लिहिले की, ‘जेव्हा मुलाला तुमचे शूज आणि कपडे बसू लागतील तेव्हा समजून घ्या की तो आता तुमचा मित्र झाला आहे. ‘हाऊ या डूइन’ बड्डी.. जोई बांग्ला.. जोई ‘बॉब बिश्वास’।’

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी ट्विटरवर चाहत्यांना हार्ट इमोजीचा अर्थ वेगवेगळ्या मार्गांनी सांगितला होता. त्यांनी लिहिले, ‘मी असा विचार कधी केला नाही कि वेगवेगळ्या रंगाच्या हार्ट इमोजीचे अर्थ देखील भिन्न आहेत. रेड हार्ट म्हणजे खरे प्रेम आणि प्रणय. काळे हार्ट म्हणजे दु: ख. पिवळे हार्ट म्हणजे आनंद आणि मैत्रीचे प्रतीक आहे. हिरवा हार्ट म्हणजे निरोगी जीवन असते आणि निळे हार्ट म्हणजे विश्वास आणि शांती. ‘

 

अमिताभ बच्चन लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय आयुष्मान खुरानासमवेत ‘गुलाबो सीताबो’ या चित्रपटातही दिसणार आहे.