Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान दिसणार अ‍ॅक्शन चित्रपटात…’आर्टिकल १५’ चा दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत पुन्हा करणार काम

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मध्ये गेची भूमिका साकारल्यानंतर आता आयुष्मान खुराना अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. त्याचा आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलर सिनेमाची अनाउंसमेंट झाली आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल १५’आणि ‘थप्पड़’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याबरोबर तो पुन्हा काम करेल.या दोघांनी याआधी ‘आर्टिकल १५’ मध्ये एकत्र काम केले आहे.

समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाविषयीची ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘मुल्क’, ‘ ‘आर्टिकल १५’ आणि ‘थप्पड़’ रिलीज झाल्यानंतर अनुभव सिन्हा पुन्हा एकदा आयुष्मान खुरानाला दिग्दर्शन करणार आहे. या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाला नाव देण्यात आले नाही … हा सिनेमा १६ ऑक्टोबर २०२० मध्ये रिलीज होईल.

 

समलैंगिकतेच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या रोमँटिक-विनोदी चित्रपटामध्ये नवखा कलाकार जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि गजराज राव देखील होते. याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.