Take a fresh look at your lifestyle.

बर्थडे स्पेशल: तब्बूच्या साडी प्रेस पासून ते काजोलच्या स्पॉटबॉयपर्यंत रोहित शेट्टीने केले सर्व काही

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । रोहित शेट्टी याला अ‍ॅक्शन किंग असे म्हंटले जाते. रोहित कॉमेडी चित्रपटातही माहिर आहे. पण अ‍ॅक्शनचा किडा रोहितमध्ये इतका घुसला आहे की त्याच्या कॉमेडी चित्रपटांमध्येही तुम्हाला उडणारी वाहने आणि अ‍ॅक्शन सीन्स दिसतात. अ‍ॅक्शन चित्रपटांतील सीन्समुळे रोहित शेट्टी यांचे सलग ८ चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये पोहोचले आहेत आणि आता ‘सूर्यवंशी’समवेतही हा विक्रम कायम राहणार आहे.

रोहित शेट्टीचा वाढदिवस १४ मार्चला येतो, या निमित्ताने रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती. रोहितने ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’ आणि ‘सिंबा’ यासारखे अ‍ॅक्शन चित्रपट केले आहेत, त्याशिवाय गोलमाल मालिकेचे ४ चित्रपट आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारख्या मजेदार कॉमेडी ब्लॉकबर्स्टर्स ही केलेले आहेत.

रोहितने दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘जमीन’ चित्रपटापासून केली. यापूर्वी रोहितने अजय देवगनच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तेथून रोहित आणि अजय यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट केले.

एका वृत्तानुसार, रोहित शेट्टी यांनी १९९५ मध्ये ‘हकीकत’ चित्रपटातील एका सीनसाठी तब्बूची साडी प्रेस केली होती. रोहित शेट्टी काजोलचा देखील स्पॉटबॉय राहिला आहे आणि तिचा टचअपही केला आहे. नंतर रोहित शेट्टीने शाहरुख खान आणि काजोलसोबत ‘दिलवाले’ आणि तब्बूसोबत ‘गोलमाल ४’ बनविला आहे.

रोहित शेट्टी यांचा पुढील कॉप युनिव्हर्स फिल्म ‘सूर्यवंशी’ २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता पण कोरोना विषाणूमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.