Take a fresh look at your lifestyle.

आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच एकतर स्वतःच्या रिलेशनमूळे चर्चेत असतो. नाहीतर मग त्याची मुलगी आयरा खान हिच्या रिलेशनशिपमूळे चर्चेत असतो. पण सध्या तो चर्चेत आहे याचे कारण तो स्वतः किंवा त्याची मुलगी नाही तर त्याचा मुलगा जुनैद खान आहे. होय. आमिरचा मुलगा जुनैद खान म्हणे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतोय. एव्हढंच नाही तर जुनैद वडिलांसोबत स्क्रीन शेअर करून हि दमदार एंट्री करणार आहे अशी माहिती मिळतेय. ‘महाराज’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत जुनैद पदार्पण करीत आहे.

आजपर्यंत आमिरचा मुलगा जुनैद हा नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिला आहे. पण आता आमिरच्या मुलानेसुद्धा बॉलिवूडची पायरी चढली आहे. खरंतर जुनैदला कॅमेऱ्यासमोर नाही तर कॅमेऱ्यामागे जास्त आवडतं, असं खुद्द त्याचे वडील म्हणजेच आमिर खानने म्हटलं आहे. पण आता तो कॅमेऱ्यासमोर दिसणार आहे अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जुनैदने याआधी ‘प्रीतम प्यारे’ या वेब सीरिजमध्ये आमिरसोबत काम केलं आहे. तेव्हाही चाहत्यांना हि जोडी भारीच भावली होती.

यानंतर आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान या सीरिज व्यतिरिक्त ‘महाराजा’ नावाचा बॉलिवूडचा सिनेमा करत आहे. या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेच. शिवाय तो स्वतः स्टार किड्समधील एक असला तरीही लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. त्याला स्वतःच्या नावाने ओळखण्यात जास्त रस असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे हा जुनैदचा वैयक्तिक निर्णय आहेच शिवाय यातून आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल यापेक्षा जास्त तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. सध्या आमिर खान त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.