Take a fresh look at your lifestyle.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर च्या ‘दस बहाने २.०’ चा मेकिंग व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । टायगर श्रॉफच्या आगामी फिल्म बागी ३ मधील ‘दस बहाणे २.०’ या प्रेक्षकांची माने जिंकली आहे. आता निर्मात्यांनी या गाण्याचा एक छोटा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये टायगर आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त संपूर्ण टीम मेहनत घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासह, सायबेरियात हे गाणे शूट करण्यात आले आहे.

सायबेरियातील एका लोकेशनमध्ये अतिशय थंड अशा वातावरणात श्रद्धा कपूर नाचताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री किती त्रास सहन करत आहे हेही स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नाही तर या गाण्यात ३०० बॅकग्राऊंड डान्सर्सचा समावेश होता. यासह हे गाणे कसे चित्रित केले गेले हे गाण्याचे क्रू मेंबर्स सांगत आहेत.
निर्मात्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ‘मी तुम्हाला पहात आहे आणि तुम्ही मला पहात आहात आणि ते अवघड बनले आहे… परंतु आम्ही एकत्र प्रत्येक अडचणीवर मात केली आहे. हे अवघड असे गाणे शूट करण्यासाठी चांगली वेळ आली. ‘

 

आतापर्यंत ‘बागी ३’ चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. जी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. फॉक्स स्टार स्टुडियोज निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी ३’ टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होईल.

 

Comments are closed.

%d bloggers like this: