Take a fresh look at your lifestyle.

हृतिकची आई पिंकी वयाच्या ६५ व्या वर्षी चढली झाडावर आणि यूजर बनले त्यांच्या फिटनेसचे चाहते

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा सुपरफिट आणि डॅशिंग हिरो हृतिक रोशनच्या फिटनेसबद्दल कोणाला विश्वास नाही. हृतिक सतत त्याच्या बॉडी शेपच्याबद्दल चर्चेचा विषय बनतो. पण फक्त हृतिकच नाही तर त्याची आई पिंकी रोशन देखील फिटनेस फ्रिक आहे. वयाच्या ६५ व्या वर्षीही हृतिक रोशनची आई पिंकी रोशन इतकी फिट आहे की ती फिटनेसबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत राहते.

नुकतीच पिंकी रोशनने तिच्या इंस्टा अकाउंटवर एक फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती झाडावर चढत आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी ही अत्यंत चपळ पिंकी रोशन खरोखर आश्चर्यकारक आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. त्यांनी लिहिलेले ‘मंजिल को पाने की ओर एक कदम’.


View this post on Instagram

 

#tryingisbetterthannothing #a step forward to achieving the goal#

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on Mar 11, 2020 at 9:01am PDT

 

हृतिक रोशन आपल्या आईवर खूप प्रेम करतो आहे, दोघही आई-मुलाची जोडी सुपरहिट आहे आणि म्हणूनच तो नेहमीच आईला प्रोत्साहित करताना दिसतो . कधीकधी हृतिक व्यायाम करताना आई पिंकीला मदत करतो, तर कधी ती त्याची प्रशिक्षक बनते आणि गुरुमंत्र देताना दिसून येते.
नुकताच हृतिक टायगर श्रॉफसोबत वॉरमध्ये दिसला होता आणि वॉर हे मागील वर्षातील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. चित्रपटातील “जय जय जय शंकर” हे गाणे ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. प्रेक्षकांचीही या दोघांना पसंती होती. मागील वर्षी हृतिकच्या सुपर ३० या चित्रपटानेही चांगली कामगिरी केली होती.
यावर्षी २५ डिसेंबरला हृतिकचा क्रिश ४ रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा त्याच्यासोबत आहे.