Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ पुढे सरसावला अभिनेता हृतिक रोशन…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । तोतरेपणामुळे विद्यापीठात सादरीकरण करण्यास परवानगी न मिळालेल्या विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ अभिनेता हृतिक रोशन पुढे सरसावला आहे. या बॉलिवूड स्टारचे म्हणणे आहे की,तोतरेपणाच्या समस्येमुळे त्याला मोठे स्वप्न पाहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझा एक दूरच भाऊ आहे, ज्याला तोतरेपणाची समस्या आहे, तो वर्गात एकदा सादरीकरण करीत होता, त्याच दरम्यान त्याचे एसओडी / व्याख्याता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला म्हणाले की “जर आपण योग्यरित्या बोलू शकत नसाल तर कदाचित आपण अभ्यास करू नये”. या घटनेनंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर पडत नाही. “

 

वापरकर्त्याने पुढे लिहिले, “त्याने आता आपल्या विद्यापीठात परत जाण्यास आणि आपल्या वर्गमित्रांसह भेटण्यास आणि अभ्यास करण्यास नकार दिला आहे. त्याचा आत्मविश्वास ढळला आहे.”

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन, जो एकदा स्पीच डिसऑर्डरने ग्रस्त होता आणि स्पीच थेरपीनंतर त्या समस्येपासून बाहेर आला होता. रविवारी त्याने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. अभिनेत्याने लिहिले की, “कृपया आपल्या भावाला सांग की प्राध्यापक आणि त्याच बोलणे हे हास्यास्पद आहेत.”

अभिनेत्याने पुढे लिहिलं,”हि समस्या त्याला मोठे स्वप्न पाहण्यापासून रोखू शकत नाही.त्याचा काही दोष नाही आणि ज्यामुळे त्याला लाज वाटेल”.हृतिक मागील वर्षी ‘सुपर 30’ आणि ‘वॉर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता.

 

Comments are closed.

%d bloggers like this: