Take a fresh look at your lifestyle.

इरफान आणि करीना कपूरचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ रिलीजच्या दिवशी झाला ऑनलाईन लीक

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । इरफान, करीना कपूर आणि राधिका मदन यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट १३ मार्चला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून बरीच काळानंतर इरफान पुनरागमन करत आहे. अंग्रेजी मीडियम हा रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. ऑनलाइन लीकचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार आहे.
प्रत्येक चित्रपटाप्रमाणे तमिळ रॉकर्सनी ‘अंग्रेजी मीडियम’लाही ऑनलाईन लीक केले आहे. चित्रपट एचडी मध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी तामिळ रॉकर्सनी ‘बागी ३’ देखील लीक केला होता.
कोरोना विषाणूचा परिणाम ‘अंग्रेजी मीडियम’वर होत होता, आता हा चित्रपट ऑनलाईनही लीक झाली आहे. कोरोना विषाणूमुळे दिल्ली, केरळ आणि जम्मू-काश्मीरमधील थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी प्रदर्शित केलेले सर्व चित्रपट १ एप्रिलनंतर या शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहेत.

 

‘अंग्रेजी मीडियम’बद्दल बोलताना हा चित्रपट आपल्या मुलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील कशी धडपड करतात हे दाखविले आहे. इरफानसोबत राधिका मदन, करीना कपूर, डिंपल कपाडिया, पंकज त्रिपाठी, दीपक डोब्रियाल, केकब शारदा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.