Take a fresh look at your lifestyle.

जयललिता यांच्या जयंतीनिमित्त कंगना रनौतने शेअर केला ‘थलाइवी’ फिल्म चा नवीन लुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त तिच्या आगामी ‘थलाइवी’ चित्रपटाचा आणखी एक लूक जाहीर केला आहे.हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन ए.एल.विजय यांनी केले आहे, तर विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर. नी निर्मिती केली आहे.

इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा नवा लूक शेअर करताना कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जयललिता यांच्या ७२ व्या जयंती वर्धापनदिनानिमित्त ‘थलाइवी’ या चित्रपटातील कंगनाचा नवा लूक. हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून यात तिच्या माहिती नसलेल्या अनेक बाबी मांडण्यात येणार आहेत.

यापूर्वी कंगनाने जयललिताचा फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुपर लेडी जयललिता यांची ७२ वी जयंती वर्धापन दिन .. त्यांच्या या कथे मध्ये त्यांच्याकडे असलेल्या गुणांबद्दल प्रकाश टाकला जाणार आहे. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन करणारे प्रत्येकजण त्यांना जया अम्मा म्हणतात. ‘

 

या चित्रपटात कंगनाशिवाय तमिळ सुपरस्टार अरविंद स्वामी एमजी रामचंद्रनची भूमिका साकारत आहेत. ‘थलावी’ तामिळ, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होईल.याशिवाय कंगना रनौत ‘तेजस’ आणि ‘धाकड’ सारख्या चित्रपटातही दिसणार आहे.