Take a fresh look at your lifestyle.

कंगनाने वाढदिवशी शहीद भगतसिंग यांच्यासाठी गायले गाणे

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेत्री कंगना २३ मार्च रोजी आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.यानिमित्ताने तिने हुतात्मा भगतसिंग यांची आठवण म्हणून एक खास संदेश दिला आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो कि सध्या व्हायरल होत आहे. इंग्रजांनी या दिवशी शहीद भगतसिंग,राजगूरु आणि सुखदेव यांना फाशी दिली होती.

 

व्हिडिओमध्ये कंगना म्हणाली, ‘आज मला माझ्या सर्व मित्र, कुटुंब, नातेवाईक आणि चित्रपटसृष्टीकडून शुभेच्छा मिळत आहेत. खूप प्रेम मिळत आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे, कारण याच दिवशी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव शहीद झाले होते. त्यांच्यासाठी मला कैफी आझमीने लिहिलेल्या काही ओळी गायला आवडेल. यानंतर कंगनाने ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों..’ असे गाणे गायले.

यानंतर,कंगना पुन्हा म्हणते, “मित्रांनो,वातावरण असेल जेव्हा आपले शहीद रंग दे बसंती गात गात देशातसाठी फाशी गेले असतील.”कंगना लवकरच ‘थलाईवी’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती दिवंगत तमिळनाडू जयललिताची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती ‘धाकड़’ आणि ‘तेजस’ मध्ये देखील दिसणार आहे.