Take a fresh look at your lifestyle.

करीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला पहिला फोटो, एका दिवसात तिचे बनले लाखो फॉलोअर्स

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । करीना कपूर खान सोशल मीडियावर आपली अ‍ॅक्टिव्हिटी वाढवत आहे. काल तिने इंस्टाग्रामवर पदार्पण केले.आपली आवडती अभिनेत्री सोशल मीडियाच्या दुनियेत दाखल झाल्यामुळे करिनाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. करिना कपूरने काल इंस्टाग्रामवर आपले अकाउंट तयार केले असून आता तिला निळा रंगाचा टिकही मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी करिनाने एका मांजरीचा व्हिडिओ शेअर केला होता. आज तिने आपला पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

करीना कपूरने आपला फोटो शेअर करत लिहिले आहे- मांजर पिशवीतून बाहेर आली आहे. # हॅलोइन्स्टग्राम.


View this post on Instagram

 

The cat’s out of the bag. #HelloInstagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 5, 2020 at 10:30pm PST

 

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर पळताना दिसला होता. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले- कमिंग सून. इंस्टाग्रामवर करीनाचे ४ लाख ७८ हजार फॉलोअर्स झाले आहेत.


View this post on Instagram

Coming soon…

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 4, 2020 at 10:31pm PST

 

करिना कपूर खान मनोरंजन जगतातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडिया वर शेअर करायला टाळत असते. बॉलिवूडमधील बहुतेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर चाहत्यांना ते आपल्या कामाशी संबंधित अनेक अपडेट देत राहतात. करीना सोशल मीडियापासून दूर असते परंतु ती बनावट आयडीसह अनेक सेलिब्रिटींना नक्कीच फॉलो करते.
करीनाचा चित्रपट ‘इंग्रजी मीडियम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.

https://youtu.be/iGVppAN_pQ4