Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाव्हायरस: अमेरिकेतून परतली ख़ुशी कपूर मुंबई विमानतळावर सॅनिटायझरने केला हात साफ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरस जगभर पसरत आहे. भारतात या साथीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या ८०च्या वर पोहोचली आहे, तर २ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनोव्हायरसच्या प्रादुर्भावाबद्दल राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. या सर्व बातम्यांच्या दरम्यान सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक बोनी कपूरने आपली मुलगी खुशी कपूरला भारतात परत आणले आहे. अलीकडेच ते दोघेही मुंबई विमानतळावर हजर झाले होते, तेथे गाडीत बसल्यानंतर खुशी सॅनिटायझरने हात स्वच्छ करताना दिसली.

कोरोनाव्हायरसमुळे भारतातील शाळा व महाविद्यालये बंद झाली आहेत. परदेशातही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत खुशी कपूरही भारतात परतली आहे.खुशी अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून अभिनयाचा कोर्स करत आहे.
बोनी कपूर आपली मुलगी खुशीसाठी मुंबई विमानतळावर दाखल झाला. जेव्हा ती गाडीत बसू लागली, तेव्हा बोनीने तिला सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, शुक्रवारी भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या ८१ झाली आहे.
त्यापैकी केरळमधील तीन लोक आहेत ज्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. याखेरीज इतर सात जणही दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधून बरे झाले आहेत.