Take a fresh look at your lifestyle.

‘पेंग्विन’चा टीझर रिलीज; दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती दिसणार सुरेश मुख्य भूमिकेत; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १९ जून रोजी ‘पेंग्विन’या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हा एक सायको लॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. ‘पेंग्विन’ हा चित्रपट आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका आईच्या शारीरिक आणि भावनिक प्रवासावर आधारित आहे. कार्तिक सुब्बाराज, स्टोन बेंच फिल्म्स आणि पॅशन स्टुडिओ प्रोडक्शन यांच्या या चित्रपटाच्या पोस्टरने यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आईचे दु: स्वप्न खरे ठरले. ट्रेलर ११ जूनला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक सुब्बाराज, स्टोन बेंच फिल्म्स आणि पॅशन स्टुडिओ प्रॉडक्शनच्या या चित्रपटात साऊथची अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे.