Take a fresh look at your lifestyle.

विदेशी भूमीवर असूनही प्रियांकाने टाळ्या वाजवून बजावले भारतीय असल्याचे कर्तव्य

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कदाचित तिचा नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसह परदेशात होम क्वारंटाइन असेल, परंतु आपल्या देशाला प्रेरणा देण्यास ती विसरली नाही. गेल्या रविवारी भारतातील जनता कर्फ्यूनंतर जेव्हा संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशवासीयांनी टाळ्या आणि थाळी वाजवून कोरोना वॉरियर्सना सलाम केला,तेव्हा यामध्ये प्रियांकाही मागे नव्हती. तिने परदेशी भूमीवरही आपले भारतीय असंण्याचे कर्तव्य बजावले.

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर टाळ्या वाजवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी भारतात नसले तरी टाळ्या वाजवते आणि या संकटाच्या वेळी खंबीरपणे उभे राहिलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांसह लोकांना धन्यवाद देते.”


View this post on Instagram

 

Priyanka supporting #JantaCurfewPledge and clapping for all the doctors and nurses. ❤

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on Mar 22, 2020 at 8:29pm PDT

 

priyanka chopra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर, जनता कर्फ्यूला लोकांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला असता देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी टाळ्या वाजवून देशाची सेवा करण्यात गुंतलेल्या लोकांचे आभार मानले.