Take a fresh look at your lifestyle.

गेल्या ८ दिवसांपासून प्रियांका आणि निक आहेत सेल्फ आइसोलेशनमध्ये

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांच्यासह कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनि स्वतःला घरात कैद केले आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, गेल्या ८ दिवसांपासून सेल्फ आइसोलेशनमध्ये राहिल्यानंतर तिच्यासोबत काय घडले आहे.

प्रियांका चोप्राने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘मला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित असाल. मी तुमचे हाल विचारायला आले आहे. ही एक अतिशय कठीण वेळ आहे आणि आपले आयुष्य अचानक बदलले आहे. मी आणि निक गेल्या आठवड्यापासून घरी होतो आणि हा सेल्फ आइसोलेशनचा ८ वा दिवस आहे. आम्ही नेहमी व्यस्त असायचो,आमच्या आजूबाजूला लोक असायची, परंतु आता असे दिसते की हाएखादा चित्रपट चालू आहे, परंतु तसे नाहीये . हे सर्व खूप विचित्र वाटत आहे. ‘

लोकांना जागरूक करण्यासाठी प्रियांका चोप्रा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि डॉक्टरांसमवेत लाइव्ह प्रोग्रॅम करणार आहेत. यापूर्वी डब्ल्यूएचओ संचालकांनीही त्यांना ‘सेफ हँड्स चॅलेंज’ साठी नॉमिनेट केले होते.भारतात कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत १७० हून अधिक लोक त्याला बळी पडले आहेत, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Comments are closed.