Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा साजिद नाडियाडवाला यांची पत्नी म्हणाली, ‘त्यांच्या पर्समध्ये अजूनही दिव्या भारतीचा फोटो’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । दिव्या भारती सुंदर होती. तरुण वयात झालेल्या अपघातामुळे बॉलिवूडमधील चमकणारा हा तारा पळवून नेला असला तरी सुंदर दिव्या भारती अजूनही चाहत्यांच्या मनात आपले स्थान धारण करते. आज दिव्या भारतीचा वाढदिवस आहे, या प्रसंगी एक किस्सा,

सर्वांना ठाऊक आहे की, दिव्या भारती हिचा तिच्या घरातील बाल्कनीतून पडल्यामुळे मृत्यू झाला. या अकाली अपघातात तिचा नवरा साजिद नाडियाडवाला पूर्णपणे खचून गेला होता. जरी त्याच्यावर दिव्या भारतीच्या मृत्यूचा आरोप होता, परंतु ते खोटे असल्याचे सिद्ध झाले. साजिद बराच काळ धक्क्यामध्ये राहिला होता पण म्हणतात ना की आयुष्य पुढे जात राहते.

जुडवा, हे बेबी, मुझसे शादी करोगी आणि किक सारख्या सुपरहिट चित्रपट देणाऱ्या साजिदने वर्ष २००० मध्ये बॉलिवूड पत्रकार वर्धा खानशी लग्न केले. वर्धा आणि साजिद यांना दोन मुले असून दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. पण दिव्याची आठवण अजूनही साजिदच्या हृदयात आहे.एका मुलाखतीत वर्धा खान म्हणाली की साजिदची पर्स उघडा आणि दिव्य भारती यांचे फोटो तुम्हाला त्यामध्ये मिळेल. साजिद दिव्याला कधीच विसरू शकत नाही, आम्हाला हरकत नाही कारण त्यांचे नटे खूप सुंदर आणि रोमँटिक होते.

दिव्या भारतीमुळेच साजिदच्या आयुष्यात वर्धा खान आली. ज्या दिवशी साजिद आणि वर्धा खान यांची भेट झाली त्यादिवशी दिव्या भारतीची पहिली पुण्यतिथी होती आणि वर्धाच्या कंपनीने तिला साजिदची मुलाखत घेण्यासाठी पाठवलं. त्यावेळी साजिदला पाहूनच वर्धाला तो आवडला आणि काही वर्षांनी दोघांचे लग्नदेखील झाले.