Take a fresh look at your lifestyle.

सलमान खान राधेमध्ये देणार ३ मोठ्या खलनायकांना टक्कर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ची घोषणा झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला असून हा चित्रपट सन २०२० च्या सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे.हा चित्रपट ईदवर रिलीज होईल आणि सलमान खान या चित्रपटामध्ये एक-दोन नव्हे तर तीन खलनायकांना सामोरे जात आहे.

या चित्रपटात तीन खलनायकाची भूमिका रणदीप हूडा, गौतम गुलाटी आणि सिक्किमचा अभिनेता सांग हे करणार आहेत. इतकेच नाही तर या चित्रपटाचे तीन वेगवेगळे अ‍ॅक्शन डायरेक्टर देखील आहेत ज्यांनी चित्रपटाचे ऍक्शन सीक्वेन्स कोरिओग्राफ केले आहेत.

२२ मे २०२० रोजी राधे:मोस्ट वॉन्टेड भाई मोठ्या पडद्यावर रिलीज होईल,यामध्ये दिशा पटानी सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे.