शाहिद कपूरने साजरा केला वाढदिवस, इनसाइड पिक्चर्स आणि व्हिडिओ पहा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेता शाहिद कपूर मंगळवारी ३९ वर्षांचा झाला आणि या दिवशी तो शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आगामी ‘जर्सी’ चित्रपटाच्या सेटवर शाहिद आपला खास दिवस घालवत आहे. शाहिद म्हणाला, “हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि विशेष म्हणजे माझ्या वाढदिवशी ‘जर्सी’ च्या सेटवर काम केल्याबद्दल मला आनंद आणि कृतज्ञता वाटते.”
शाहिद कपूरने आपल्या कुटूंबासमवेत केक कापल्याचे फोटोही समोर आले आहेत. शाहिदसोबत त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर आणि वडील पंकज कपूरही दिसले आहेत.
शाहिदची पत्नी मीरा राजपूत कपूरने त्याच्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मस्त पोस्ट लिहिली, “तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.
एक फोटो शेअर करताना मीराने लिहिले की, “माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत.
शाहिदचा भाऊ ईशान खट्टरनेही त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने शाहिदचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केले.फोटोंसमवेत असलेल्या कॅप्शनमध्ये ईशानने लिहिले आहे, “मेरे बडे मियां. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाईजान.”
OG ❤️ Mere #bademiya 🔥 Happy budddayyyy bhaijaaaaaaan