Take a fresh look at your lifestyle.

बाॅलिवुडमधील ‘ही’ मोठी गायिका सलमान खान वर भडकली

मुंबई । सुशांतसिंग च्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये अनेक चर्चाना उधाण आले आहे. घराणेशाही आणि एकाधिकारशाही विरुद्ध अनेकांनी आवाज उठवला आहे. सलमान खानवर अनेकांनी निशाणा साधला आहे. त्याने अनेकांचे करिअर बरबाद केले असल्याचे म्हंटले जात आहे. कंगना रनौत सह अनेकांनी सलमानवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे सलमानचा चाहतावर्ग भडकलेला दिसतो आहे. यावर सलमान खानने आपल्या चाहत्यांना उद्देशून एक ट्विट केले होते. यावर आता सोना महापात्रा भडकली आहे. तिने एक ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘माझ्या सर्व चाहत्यांना विनंती विनंती आहे, सुशांत च्या चाहत्यासोबत उभे राहा त्यांच्या चुकीच्या भाषेकडे लक्ष देऊ नका त्या पाठीमागील त्यांच्या भावना लक्षात घ्या. कृपया त्याच्या चाहत्यांना, कुटुंबाला आधार द्या. एखाद्या जवळच्या माणसाचे जाणे खूप वेदनादायी असते. असे त्याने म्हंटले आहे.’ या ट्विटवर सोना भडकली आहे. आणि सलमानला माफी मागण्याची काहीच गरज नाही. असे ती म्हणाली आहे.

या ट्विटवर गायिका सोना मोहापात्रा हिने मात्र संताप व्यक्त केला आहे. हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं ती म्हणाली आहे. “पोस्टर बॉयने पीआरच्या मदतीने एक मोठा मूव्ह खेळला आहे. डिजिटल आर्मीच्या मदतीने दिलेल्या धमक्यांना उत्तर देण्याची खरंच गरज नव्हती. जेव्हा जेव्हा तो अशा प्रकरणांमध्ये अडकतो, तेव्हा आपल्या वडिलांना पुढे करतो.” अशा आशयाचे ट्विट मोहाने केलं आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.