Take a fresh look at your lifestyle.

गायक अरमान मलिकने इंस्टाग्रामवरून हटवल्या सर्व पोस्ट,लिहिले ‘बस्स… आता सहन करू शकत नाही’

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । प्रसिद्ध गायक अरमान मलिकने आपल्या इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट हटवून सर्वांना चकित केले आहे. सिंगरकडून इंस्टाची सर्व पोस्ट काढून टाकण्यापूर्वी त्याने आपला प्रोफाईल फोटोही काळा केला आहे. यासह अरमानने एक छायाचित्र शेअर केले. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी यापुढे सहन करणार नाही.’ या पोस्टनंतर, त्याचे चाहते कमेंटद्वारे बरेच प्रश्न विचारत आहेत. असे काय घडले आहे की अरमानने असे पाऊल उचलले आहे. अरमानने मात्र अद्यापही याबद्दल काहीही उघड केलेले नाही.

तसेच ट्विटरवर एक पोस्ट लिहून अरमान म्हणतो, ‘वेळ सर्व काही ठीक करते. काळजी करू नका.

दुसरीकडे, अरमान मलिकने ट्विटर प्लॅटफॉर्मवर दहा लाख फॉलोअर्स केल्याबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. आपला एक सेल्फी शेअर करत त्याने लिहिले की, ‘अखेर ट्विटरवर १ मिलियन … पुढे आणि आता कोणीही मागे वळून पहात नाहीये .. जाऊ देत !!’
अरमान मलिक यांच्या ट्विटरशिवाय फेसबुक देखील सर्व नॉर्मल आहे. तरीही, अरमानने हे असे का केले, त्याबद्दल केवळ तोच सांगू शकेल.

अरमानच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट गाणी गायली आहेत. प्ले बॅक सिंगर म्हणून ‘पति-पत्नी और वो’,’आर्टिकल 15′,’कबीर सिंह’,’दे दे प्यार दे’ याशिवाय अरमान खानची ‘मैं रहूं या न रहूं’, ‘बोल दो ना ज़रा’‘ हां मेरे पास तुम रहो जाने की बात न कहो’ ‘वजह तम हो’ अशी अनेक गाणी हिट झाली.

या चित्रपटांव्यतिरिक्त अरमान मलिक ने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लायन किंग’ चित्रपटासाठी देखील एक गाणे गायले होते.