Take a fresh look at your lifestyle.

रिलीजपूर्वीच,तापसी पन्नूच्या ‘थप्पड़’ चित्रपटाला भेट,’थप्पड़’ मध्य प्रदेशात करमुक्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मध्य प्रदेशात तापसी पन्नूचा आगामी ‘थप्पड़’ हा चित्रपट करमुक्त झाला आहे. हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करून हा चित्रपट करमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले, “मध्य प्रदेशात २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘थप्पड़’ या हिंदी चित्रपटाची पटकथा एका सामाजिक संदेशावर आधारित असून त्याला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) मधून सूट देण्यात आली आहे.”

चित्रपटाच्या पटकथा संदर्भात कमलनाथ म्हणाले, “चित्रपटाची पटकथा लैंगिक भेदभाव, हिंसा, स्त्री परिवर्तन, समानता आणि स्वाभिमानासाठी संघर्ष यावर आधारित आहे.”

 

दिग्दर्शक अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड़’ हा एक महिला केंद्रित चित्रपट आहे. चित्रपटात घरगुती हिंसा कशी सुरू होते हे चांगलय पद्धतीनं दाखविण्यात आले आहे. चित्रपट लैंगिक भेदभावाच्या हिंसाचाराविरूद्ध आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिका साकारत आहेत.

Comments are closed.

%d bloggers like this: