Take a fresh look at your lifestyle.

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चित्रपटाच्या मल्टी-सिटी स्क्रीनिंगला भारतभरात मिळाला चांगला प्रतिसाद

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अनुभव सिन्हा आणि भूषण कुमारचा पुढील चित्रपट ‘थप्पड’ रिलीज होणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला असून अनेक माध्यम दिग्गजांनी हा चित्रपट पाहिला आहे. ज्याने हा चित्रपट पाहिला आहे त्या प्रत्येकाने या चित्रपटाची खूप प्रशंसा केली आहे.

हंसल मेहता, सुधीर मिश्रा आणि विशाल भारद्वाज यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील विविध निर्देशकांनी दिल्ली, जयपूर आणि भोपाळ येथे तापसी पन्नू अभिनीत थप्पड च्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले आहे. या शहरांमध्ये या चित्रपटाला बरीच दाद मिळाली असून अनेकांना ‘या वर्षातला सर्वात महत्त्वाचा चित्रपट’ म्हणून सांगितले आहे.
या प्रतिसादाबद्दल बोलताना भूषण कुमार म्हणाले की, “चित्रपटाला जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी आणि अनुभव आणि मी खुपच खूष आहोत. अनुभवने सहजपणे असा महत्त्वपूर्ण विषय हाताळला आहे. हा चित्रपट या शुक्रवारी प्रेक्षकांना दाखविण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. “

त्याचबरोबर दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणतात, “या चित्रपटात तापसीची भूमिका छान आहे. एक टीम म्हणून आम्ही जे काही केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवण्यास मी खरोखर उत्साही आहे.”अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार निर्मित आणि तापसी पन्नू अभिनीत ‘थप्पड’ २८ फेब्रुवारी, २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे.