Take a fresh look at your lifestyle.

‘तख्त’च्या लेखकाने केले हिंदूं विरोधात ट्विट,ट्विटरवर ट्रेंड होतोय ‘बायकॉट तख्त’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । चित्रपट निर्माता करण जोहरचा आगामी ‘तख्त’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे. चित्रपटाचे पटकथा लेखक हुसेन हैदरी यांनी हिंदूंच्या विरोधात ट्विट केले असून त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यांच्यावर हिंदूविरोधी ट्विट केल्याचा आरोप आहे.
हुसेनचा ट्विटर अकाउंट बंद आहे.परंतु,त्याच्या ट्विटमध्ये ‘हिंदू आतंकवाद’ अशा मजकूर जो लिहिलेलाआहे त्याचे चे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. बहुतेक ट्विटमध्ये हैदरीला चित्रपटाच्या टीम मधून हटविण्यात यावे अन्यथा चित्रपटावर बहिष्कार घालू अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एका यूजर ने लिहिले, “हे धर्मामूवीज, तुझ्या पगारावर जगणारा हा माणूस रात्रंदिवस हिंदू धर्माची बदनामी करतोय म्हणूनच आम्ही या चित्रपटावर बहिष्कार घालतोय.”

दुसर्‍याने एकाने लिहिले, “हा माणूस ‘तख्त’ चा लेखक आहे. पण हा निर्लज्ज हिंदू अजूनही त्याच्याबरोबर चित्रपट करत आहे.”