Take a fresh look at your lifestyle.

पाळीव मांजर जेडीच्या मृत्यूवर टायगर श्रॉफने व्यक्त केला शोक, हा फोटो सोशल मीडियावर केला शेअर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पाळीव मांजर जेडीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ही मांजर १७ वर्षांपासून त्याच्या कुटुंबात होती. टायगरने त्याच्या आवडत्या पाळीव मांजरीच्या जेडीच्या चित्रासह इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, “देवा माझ्या मित्राला आशीर्वाद दे.१७ वर्षांपासून फक्त आनंद आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या प्रत्येक आयुष्यात तू आमच्यापाशीच असशील.जिथे जिथे राहशील तिथे आनंदी रहा, निरोगी रहा आणि खेळत रहा, मी पुन्हा तुला साथ द्यायला मी येईन. खूप प्रेम. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. “

 

टायगरची तीच पोस्ट जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा पोस्ट केली आणि जेडीला निरोप दिला. टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ हिनेही इंस्टाग्रामवर लिहिले- “माझी सुंदर छोट फरवाल बाळ,आतापर्यंतचा कोमल, गोड आणि शुद्ध आत्मा आहेस. आयुष्यभर आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. आर.आय.पी. , छोटा देवदूत. “

 

 

टायगर आणि कृष्णाची आई आयशा श्रॉफ यांनी लिहिले – “आमच्या जेडीला निरोप. तुम्ही आम्हाला १७ वर्षे फक्त शुद्ध प्रेम दिले.”

 

त्याच वेळी दिशा पटनी, जॅकलिन फर्नांडिस, डब्बू रत्नानी आणि रेमो डिसोझा या दिग्गज कलाकारांनी टायगरच्या पोस्टवर कमेंट केले.टायगर श्रॉफचा नवीन चित्रपट बागी ३ नुकताच ६ मार्च रोजी रिलीज झाला. एका आठवड्यात टायगरच्या चित्रपटाने ९०.६७ कोटी रुपयांचा कलेकशन केला.