Take a fresh look at your lifestyle.

यामुळे ट्विंकल खन्ना लपवत होती आपला चेहरा, व्हिडिओ शेअर करून दिली माहिती

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने नुकतच एका अ‍ॅड फिल्मसाठी शूट केले होते, पण काम संपवून जेव्हा ती आपल्या गाडीकडे परत येत होते, तेव्हा तिने आपला चेहरा कागदावरुन झाकून घेतला. आता ट्विंकलने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि यासाठी कारणही दिले आहे.

व्हिडिओ शेअर करताना ट्विंकल खन्ना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मास्क संपल्यानंतर लोक काय करतील ते मी देखील करत आहे. मी युनिब्रोमध्ये रॉक करतीये.. काहीतरी नवीन येत आहे .. मोठ्या सरप्राइजची वाट पहा. ‘ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप हसत आहेत.

 

विशेष म्हणजे कोरोनाव्हायरसबद्दल जगात एकच हाहाकार माजला आहे. हे टाळण्यासाठी लोक मास्क आणि सेनिटायझर्स वापरत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीही चाहत्यांना हा विषाणू टाळण्याचा सल्ला देत आहेत.

ट्विंकल खन्ना एक निर्माती असण्याबरोबरच एक लेखिकापण आहे. तिने २०१८ साली तिचे प्रॉडक्शन हाऊस मिसेस फनीबोन्स मूव्हीज सुरू केले आणि पती अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले.