Take a fresh look at your lifestyle.

विशाल भारद्वाज यांचे ट्वीट झाले व्हायरल, ते म्हणाले -‘दिल्ली पोलिस अधिकाऱ्यानो…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड लेखक-दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. अलीकडेच त्यांनी एक ट्विट केले असून त्यावर बरीच चर्चा होते आहे. या ट्विटमध्ये विशाल भारद्वाज यांनी ट्विटरवर दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे.नागरिकता दुरुस्ती कायद्यावर दिल्लीत बराच मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात जवळपास ५० जणांनी आपला जीव गमावला. त्यावरून दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले. आता बॉलिवूड लेखक-दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिल्ली पोलिसांना कडक इशारा देताना दिसत आहेत.

 

“दिल्ली पोलिसांचे कामगिरी ऐकून जंगलामध्ये जनावरेही घाबरले आहेत” असे लिहून लेखक-दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्ली पोलिसांवर टीका केली. विशाल भारद्वाज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोकही यावर बरीच कमेंट्स देत आहेत.

विशाल भारद्वाज बहुतेक वेळा समकालीन विषयांवर लोकांसमोर आपले मत मांडताना दिसतात. विशाल भारद्वाजची ट्वीट्स खूपच चर्चेत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि एनआरसी (सीएए) यांनाही त्यांनी आपला विरोध दर्शविला.