Take a fresh look at your lifestyle.

हॉस्पिटलमध्ये ‘हूड हूड दबंग’ गाताना वाजिद खान भाऊ साजिद खानला म्हणाला- ‘लव्ह यू भाई’ पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद खानचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये सलमान खानच्या चित्रपटाचे गाणे ‘हूड हूड’ गाताना दिसत आहे. या परिस्थितीतही त्याचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. मात्र, त्याला ओळखणे खूप कठीण आहे. वाजीद खानने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले.

आपल्या भावाला डेडिकेट करताना वाजिदने हे गाणे गायले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानही त्याने सर्वांचे आपल्या गाण्यातून मनोरंजन केले. व्हिडीओमध्ये त्याला गाणे गाताना पाहून एक महिलाही आंनदाने हसत होती.

 

साजिद वाजिदने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. वाजिद याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सलमाननेही एक ट्विट केले आहे.

 

 

कोविड -१९ चा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन दरम्यान साजिद-वाजिदने अलीकडेच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी गाणी रचली, त्यातील एक गाणे ‘प्यार करोना’ हे होते. हे पॉप एंथम (गाणे) सर्वांना कोरोनाव्हायरस साथीच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करायला तयार केले होते. एप्रिलमध्ये रिलीज झालेले हे गाणे सलमानने आपल्या आवाजात गायले आहे.

संगीतकारांच्या या जोडीने नुकतेच सलमानचे ईदसाठीचे खास गाणे ‘भाई-भाई’ देखील बनवले होते. हे गाणे जातीय सलोख्याचे आहे. सलमान खानसाठी संगीतकार म्हणून साजिद-वाजिदने बर्‍याचदा काम केले आहे. १९९८ साली सलमानच्या सुपरहिट फिल्म ‘प्यार किया तो डरना क्या से’ मधून त्यांनी डेब्यू केला होता.