Take a fresh look at your lifestyle.

‘यादों की बारात’ फेम अभिनेता इम्तियाज खान यांचे निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अमजद खानचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता इम्तियाज खान यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. इम्तियाज खान यांच्या निधनाची बातमी जावेद जाफरी यांनी शेअर केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “ज्येष्ठ अभिनेते इम्तियाज खान यांचे निधन झाले आहे. महान अभिनेता आणि एक अद्भुत मनुष्य.

 

 

फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट अतुल मोहन यांनी इम्तियाज खानच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले. त्यांनी ट्वीट केले, “हिंदी चित्रपट अभिनेता इम्तियाज खान, ज्येष्ठ अभिनेते जयंत यांचा मुलगा, दिवंगत अभिनेता अमजद खानचा भाऊ आणि टीव्ही अभिनेत्री कृतिका देसाई यांचे पती इम्तियाज खान यांचे आज निधन झाले.ते ‘यादों की बारात’ आणि ‘दयावान’ यां सारख्या चित्रपटांमध्ये दिसले. “प्रार्थना.”

इम्तियाज खान यादों की बारात, धर्मात्मा, दयावान, नूरजहां या चित्रपटांमध्ये काम केले. इम्तियाज खान यांच्या पश्चात पत्नी, अभिनेत्री कृतिका देसाई आणि मुलगी आयशा खान असा परिवार आहे.

 

'मेरे अंगने में' की एक्ट्रेस कृतिका देसाई से हुई थी शादी

Comments are closed.

%d bloggers like this: