Take a fresh look at your lifestyle.

अफवांमध्ये होतं तथ्यं ! ‘हे’ चारही स्टार्स दिसणार एकत्र; ‘बंटी और बबली २’ चा टीजर लाँच

‘कजरारे’चा पण रिमेक बनण्याची दाट शक्यता !

पिच्चर अभी बाकी है । २००५ मध्ये रिलीज झालेल्या अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीच्या ‘बंटी आणि बबली’ ने चित्रपटासह बॉक्स ऑफिसवरही पैशांची लूट केली होती. यशराज फिल्म्स चे प्रोडक्शन असलेल्या या चित्रपटाचा सिक्वल वर्षभरापूर्वी घोषित करण्यात आला होता, त्यावेळी त्यात सैफ आणि राणी असल्याचं सांगण्यात येत होत. मात्र एक महिन्यापूर्वी झालेल्या अनाउन्समेंट मध्ये चित्रपटात गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी आणि नवतारका शर्वरी वाघ असल्याची कन्फर्म बातमी होती. त्यामुळे सैफ चे काय झाले? कास्टिंग मध्ये एवढा कसा फरक पडला असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.

   आता मात्र चित्रपटाचा फर्स्ट ऑफिशिअल स्टार कास्ट अनाउन्समेंट व्हिडिओ रिलीज केला आहे, आणि या सिक्वल मध्ये सैफ, राणी, सिद्धांत आणि शर्वरी हे चौघे पण असल्याचे समजते. आता हि स्टारकास्ट तगडी झाल्यामुळे चित्रपटाविषयी जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे.

   आज सकाळपासून ट्विटरवर #BuntyAurBabli2 हा हॅशटॅग ट्रेंडिंग होत आहे. ओरिजिनल चित्रपटातील अमिताभ बच्चन त्यांच्या पात्राचं काय झालंय त्याची अजून काही माहिती नसली तरी, त्या जागी खुद्द बच्चन किंवा त्या तोलामोलाचा कोणी सुपरस्टार आणि ऐशच्या ‘कजरारे’चा रिमेक बगःयला मिळाला तरी आश्चर्य नाही वाटणार. तेवढं तरी आपण बॉलीवूडला ओळखतोच!