Take a fresh look at your lifestyle.

प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ने केली इतकी कमाई

0

चंदेरी दुनिया । सलमानचा ‘दबंग ३’ हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल असे म्हटले जात आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग’ने आपली कमाई सुरु केली आहे. अमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून ‘दबंग’ने तब्बल १५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. सलमान खान आणि भाऊ अरबाज खानच्या मदतीने ‘दबंग ३’ची निर्मिती केली आहे. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे हक्क अमेझॉन प्राइम व्हिडिओला ६० कोटी रुपयांचा विकले. त्याचवेळी त्यांनी ८० कोटी रुपयांना चित्रपटाचे सेटेलाईट हक्क झी नेटवर्कला विकले. शिवाय टी सीरिजने चित्रपटाचे संगीत हक्क १५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहेत. परिणामी प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ने तब्बल १५५ कोटी रुपये मिळवले आहेत.

या आधीच्या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

‘दबंग -३’ हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: