Take a fresh look at your lifestyle.

कानातून रक्त वाहत असतानाही ती नाचत राहिली..

0

चंदेरीदुनिया | संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील भव्यदिव्यता आणि कलाकारांचा दमदार अभिनयामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.जितकं या सिनेमाला चाहत्यांनी प्रतिसाद दिला तितकच चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांची पसंती मिळाली. या चित्रपटात माधुरी दीक्षितने चंद्रमुखी आणि ऐश्वर्या रायने पार्वतीच्या भूमिका साकारल्या होत्या.याच चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे गाणं आजही अनेकदा ऐकलं जातं.

या गाण्यात ऐश्वर्या आणि माधुरी यांनी अविस्मरणीय नृत्य केलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं बॉलिवूडमधली सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक मानलं जातं.गाण्याच्या चित्रीकरणावेळी दोन्ही अभिनेत्रींवर भरपूर मेकअप आणि दागिन्यांचा वापर करण्यात आला होता. यामुळे ऐश्वर्याला दुखापतही झाली होती. वजनाने जड असलेले कानातले घातल्याने ऐश्वर्याच्या कानाला दुखापत होऊन कानातून रक्त येऊ लागलं होतं.चित्रीकरणाचं महत्त्व लक्षात घेऊन तिने त्रास होऊनदेखील चित्रीकरण थांबवलं नाही.

एवढंच नाही तर तिच्या कानातून रक्त येतंय हेही तिने सेटवर कोणाला कळू दिलं नाही.प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खानने या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. दुर्गापुजेवर आधारित या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. गाण्यात काही अप्रतिम शास्त्रीय नृत्याच्या अदा होत्या. या गाण्यासाठी सरोज यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Leave a Reply

%d bloggers like this: